शाडूमातीचे नूतनीकरण आणि पुनर्वापर मोहिमेबद्दल
गणेशमूर्तींच्या विसर्जनानंतर शाडूमाती आणि चिकणमातीचा गाळ गोळा करून त्याचे मूर्तिकारांना पुनर्वितरण करण्यासाठी ही शहरव्यापी मोहीम राबविण्यात येत आहे. आमचे मुख्य कार्य हे सुनिश्चित करणे आहे की ही माती स्वच्छ ठेवली गेली आहे आणि काळजीपूर्वक साठवली आहे जेणेकरून मूर्तिकारांना ती पुन्हा वापरता येईल. आम्हाला असे मूर्तिकार शोधावे लागतील जे अशी शाडूमाती अथवा चिकणमाती स्वीकारतील आणि पुढील वर्षी गणेशमूर्तींच्या उत्पादनात या मातीचा पुनर्वापर करतील.
२०२२ मध्ये आम्ही पुणे आणि नाशिकमध्ये याची अंमलबजावणी करणार आहोत.
वेगळे करणे आणि संकलन करणे
चिकणमाती गाळ खाली दिल्याप्रमाणे संकलित केला जाऊ शकतो:
१. प्रत्येक सोसायटीमधील रहिवाशी सोसायटीमधे एका विशिष्ट जागी गोळा करू शकतात.
२. संपूर्ण शहरातील पुर्वनियोजित संकलन केंद्रांवर.
३. गणेशोत्सवादरम्यान ठरविलेल्या दिवशी.
याची खात्री करण्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे
१. गाळ स्वच्छ आहे आणि त्यात इतर सेंद्रिय कचरा नाही जसे की फुले.
२. वेगवेगळ्या चिकणमाती एकत्र मिसळल्या गेल्या नाहीत.
३. पीओपी, कागद आणि शेणाच्या बनविलेल्या मूर्ती मातीच्या गाळात मिसळल्या जात नाहीत.
वाहतूक आणि पुनर्वितरण
या मोहिमेत दोन महत्त्वाचे घटक आहेत - जे मातीचा गाळ देतील आणि ते जे असा गाळ पुन्हा वापरण्यासाठी स्वीकारतील. अशी संकलित केलेली माती एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी एकत्र गोळा करून पोहोचवण्यासाठी त्याची वाहतुक करावी लागते. संकलनाच्या दोन दिवशी हे करण्याकरिता टेम्पोची आवश्यकता असेल.