Frequently Asked Questions
-
आम्ही शिफारस करतो की प्रत्येक व्यक्तीने किंवा कुटुंबाने मातीच्या मूर्तींचे विसर्जन घरीच स्वच्छ पाण्याच्या बादलीत करावे. बादलीत पाणी भरण्यापूर्वी बादलीच्या तळाशी एक मोठे कापड ठेवा. मूर्तीचे विघटन होऊन माती विखुरली की, मातीचा गाळ गोळा करण्यासाठी कपड्याची टोकं एकत्र आणा आणि माती कोरडी करा – माती कोरडी झाल्यावर कपड्याची टोकं एकत्र बांधून पोटली तयार करा – तुमच्याजवळच्या कोणत्याही संकलन केंद्रावर (ड्रॉप ऑफ पॉइंटवर) ही पोटली द्या.
प्रात्यक्षिक पाहण्यासाठी हा व्हिडिओ पहा.
-
चिकणमाती हे एक खनिज आहे, जे खाणींमधून काढले जाते - हे एक अपारंपरिक संसाधन आहे. याची उपलब्धता मर्यादित आहे. मातीचा वारंवार पुनर्वापर (reuse & recycle) केल्याने अखेरीस ताज्या मातीचे उत्खनन कमी होण्यास मदत होईल.
-
तुमच्या जवळचे ठिकाण शोधण्यासाठी कृपया आमच्या संकलन केंद्रांचा (ड्रॉप ऑफ स्थानांचा) नकाशा पहा.
आपण येथे नकाशा शोधू शकता. here.
-
नैसर्गिक चिकणमाती हे एक खनिज आहे, जे जमिनीतून काढले जाते. बेंटोनाइट किंवा पांढरी चिकणमाती म्हणूनही ओळखले जाणारे हे खनिज भारतभर अनेक ठिकाणी आढळते. परंतु सगळ्यात मोठ्या खाणी गुजरात आणि पश्चिम बंगालमध्ये आहेत - चिकणमाती नंतर इथूनच इतर राज्यांमध्ये नेली जाते.
-
चिकणमाती हे खनिज असल्याने ते नूतनीकरण करण्यायोग्य नाही - याचा अर्थ असा की एकदा तुम्ही ते जमिनीतून काढले की तुम्ही ते पूर्ववत करू शकत नाही (परत ठेवू शकत नाही किंवा ते वाढवू शकत नाही). खाण उद्योग (मायनिंग इंडस्ट्रीज्) त्या ठिकाणच्या पर्यावरणावर नकारात्मक परिणाम करतात.
याव्यतिरीक्त जेव्हा एका परिसंस्थेतील (इकोसिस्टिम) चिकणमातीची दुसर्या परिसंस्थेमध्ये विल्हेवाट लावली जाते तेव्हा तिला त्या पर्यावरणाशी एकरूप होण्यास जास्त वेळ लागतो.
हे गणेशोत्सवासारख्या सणांमध्ये मोठ्या प्रमाणावर घडते तेव्हा पर्यावरणाची हानी होते.
-
प्लास्टर ऑफ पॅरिस मानवनिर्मित आहे - जेव्हा ही पावडर पाण्यात मिसळली जाते तेव्हा होणारी प्रक्रिया ही रासायनिक असते, जी उलट (reverse) करता येत नाही.
जेव्हा नैसर्गिक चिकणमाती पाण्यात मिसळते, तिच्यात पाणी शोषले जाते, स्थितीबदल होतो. तथापि त्यात रासायनिक बदल होत नाही. जेव्हा पाण्याचे बाष्पीभवन होते तेव्हा चिकणमाती मूळ संरचनेत परत येते.
दोन सामग्रींमधे चिकणमाती वापरण्याची शिफारस केली जाते कारण ती ओलावा शोषणारी असल्याने ती सहजपणे वातावरणाशी एकरूप होऊ शकते.
-
सध्या पुणे, नाशिक शहरात माती किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींची पर्यावरणपूरक पद्धतीने विल्हेवाट लावण्याची व्यवस्था नाही. मूर्तिकारांना माती परत करून अशी व्यवस्था निर्माण करण्याचा पुनरावर्तन मोहिमेचा प्रयत्न आहे. सध्या शाडू / चिकणमाती आणि प्लास्टर ऑफ पॅरिस दोन्हीही मोठ्या प्रमाणात शहरात किंवा शहराबाहेर पडीक जागा आणि पडीक खाणींमध्ये टाकले जाते.
-
होय! आपण हे करू शकता. तथापि, या मौल्यवान संसाधनाचे व्यवस्थापन करण्याचा 'पुनर्वापर' हा एक चांगला मार्ग आहे.
-
-
-
-
-